पुणे

बांदलवाडी येथील वणव्यात फळबागेचे नुकसान

CD

परिंचे,ता.११: बांदलवाडी (ता. पुरंदर) नजीक नारगेवस्ती येथे लागलेल्या वणव्यात फळबागेचे नुकसान झाले आहे. काळदरी गावचे सरपंच गणेश जगताप व बहिरवाडी गावचे सरपंच दशरथ जानकर यांनी वणवा पेटवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
कुंभोशी, मिसाळवाडी परिसरातून या वणव्याला सुरवात झाली. पुरंदर किल्ल्याच्या शेजारी असलेल्या सुपलाई डोंगरावरून वणवा पेटत आला. बघता बघता रामवाडी, विठ्ठलवाडी,बांदलवाडी परिसरातील चराऊ रान व जंगल होरपळून निघाले. तुकाराम नारगे यांची हातातोंडाशी आलेली फळझाडे वणव्यात होरपळून निघाली. जनावरांचा चारा जळाल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे संजय नारगे यांनी सांगितले. वनविभागाबरोबर खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संतोष कुढळे, जनार्दन जाधव, हनुमंत कुढळे, नवनाथ जाधव आदी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केले. वणवे लावण्याचे सत्र थांबत नसल्याने बांधावरील फळ बागा जगवायच्या कशा, असा सवाल शेतकरी तुकाराम बाबूराव नारगे यांना केला आहे.
पुरंदर तालुका वन परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, संभाव्य ठिकाणी जाळ रेषा काढण्यात आल्या आहेत. वणवा लावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT