पुणे

आदर्श आश्रमशाळा तयार करण्यासाठी राजपूरच्या शाळेची निवड : गायकवाड

CD

घोडेगाव, ता १७ : राज्यातील अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेतच दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी राज्यातील १०० मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या शासकीय आश्रमशाळा आदर्श आश्रमशाळा म्हणून तयार करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात ३० शासकीय आश्रमशाळा या आदर्श आश्रमशाळा करण्यासाठी आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेल्या बांधकाम विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे. त्यापैकी घोडेगाव प्रकल्प अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर (गाडेवाडी, ता.आंबेगाव) या शाळेची निवड झाली आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी दिली.
राजपूरच्या शाळेमध्ये मुख्य प्रवेशद्वार, मल्टीपर्पज हॉल, डायनिंग हॉल, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, धोबी घाट, ड्राईंग शेड, शालेय इमारत रंगकाम, म्युझिक रूम, वर्ग-३ व वर्ग-४ निवासस्थान, मुख्याध्यापक निवासस्थान, स्टोअर रूम व चौकीदार कक्ष या सुविधांचा समावेश केला आहे, अशी माहिती प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष सुभाषराव मोरमारे, मुख्याध्यापक नरसाळे व्ही.एस.व नवनाथ भवारी यांनी दिली.
...........................................
01319

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT