पुणे

आग्या मोहोळाच्या हर्ल्ल्यांमुळे खामगावमधील नागरिक त्रस्त

CD

आपटाळे, ता. ६ : खामगाव (ता. जुन्नर) येथे आग्या मोहोळाच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (ता. ५) घडली. गेल्या दोन दिवसांपासून सततच्या होत असलेल्या मधमाशांच्या हल्ल्यांमुळे स्थानिक शेतकरी त्रस्त झाले असून, वनविभागाने तातडीने या मधमाशांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
खामगाव येथे माणिकडोह धरणाच्या कॅनॉलवरील पुलाच्या खालच्या बाजूने जवळपास १० ते १२ मधमाशांच्या आग्या मोहोळाची पोळे आहेत. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांवर गेल्या दोन दिवसांपासून मधमाशा हल्ला करत आहेत. मधमाशांनी शेतावर जात असलेल्या सुनीता सुनील आहेर यांच्यावर हल्ला चढविला. यात त्या गंभीरपणे जखमी झाल्या असून त्यांच्यावर जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच येथील शेतकरी खंडू पानसरे, रवींद्र पानसरे, जालंदर शेलार, पांडुरंग कारभळ, रवींद्र कारभळ यांच्यावर देखील या मधमाश्यनी हल्ला करत जखमी केले आहे.
दरम्यान, रोकडे वस्तीवर मधमाशांच्या हल्ल्यात वसंत आनंदा रोकडे यांची एक शेळी मृत्यूमुखी पडली तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच या हल्ल्यात अमोल शेळके, विशाल रोकडे, प्रणव रोकडे हे जखमी झाले असून सावरगाव येथील आरोग्य केंद्रात यांच्यावर उपचार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT