पुणे

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सिकंदर शेख

CD

सोमेश्वरनगर, ता. १ ः माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सिकंदर शेख यांची तर सचिवपदी न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप जगताप यांची बिनविरोध निवड झाली.
शारदानगर (ता. बारामती) येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव नागनाथ ठेंगल यांच्या अध्यक्षतेखाली तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा पार पडली. याप्रसंगी डी. सी. धुमाळ, एस. एन. गावडे, प्रवीण साठे, एस. पी. जगताप, दत्तात्रेय पांढरे उपस्थित होते. सर्व निवडी एकमताने बिनविरोध झाल्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे मावळते अध्यक्ष आर. ए. धायगुडे यांनी केले. आभार एस. एम. मुंडे यांनी मानले.
नवनिर्वाचित कार्यकारिणी - कार्याध्यक्ष - गणपत गवळी (धो. आ. सातव विद्यालय, बारामती), उपाध्यक्ष - अनिल धुमाळ (न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी), जयवंत नाकुरे (भैरवनाथ विद्यालय, मेडद) व शब्बीर इनामदार (न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती) सहसचिव - डी. व्ही. इंगळे (विठ्ठल विद्यालय, कांबळेश्वर) व अनिल चव्हाण (वसतीगृह विद्यालय कऱ्हाटी) विद्यासमिती सचिव- संजय कांबळे (न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी) विद्यासमिती सहसचिव - ए. एल. काटे (भैरवनाथ विद्यालय, उंडवडी), एम. डी. बाबर (सोमेश्वर विद्यालय, अंजनगाव). खजिनदार - उमेद सय्यद (मएसो. बारामती). ऑडिटर - एम. डी. कोकरे (गडदरवाडी विद्यालय), प्रसिद्धिप्रमुख- एच. एस. ढमे (न्यू इंग्लिश स्कूल नारोळी). वार्ता सहसंपादक- आर. एच. शिंदे (नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे). उपक्रम प्रमुख - दीपाली ननावरे (काकडे विद्यालय, निंबूत). विनाअनुदानित प्रतिनिधी - ए. जी. दुधाळ (जनहित विद्यालय, बारामती), इंग्रजी शाळा प्रतिनिधी - राम साळुंके (क्रिएटिव्ह स्कूल बारामती)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT