पुणे

वाळुंज सोसायटीच्या अध्यक्षपदी विठ्ठल म्हेत्रे

CD

खळद, ता. २८ : वाळुंज (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्यापदी अध्यक्षपदी विठ्ठल सादबा म्हेत्रे; उपाध्यक्षपदी निवृत्ती ज्ञानोबा इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वाळुंज सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यात तेरा जागांपैकी आठ जागांवर शिवसेनेने ८, राष्ट्रवादी काँग्रेस ५ असे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेकडून सर्जेराव इंगळे, अंकुश इंगळे, विठ्ठल म्हेत्रे, लक्ष्मण म्हेत्रे, निवृत्ती इंगळे, लता इंगळे, रघुनाथ चौरे, मुक्ताजी जगताप; तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोनबा भोंगळे, प्रभाकर इंगळे, आत्‍माराम इंगळे, गणेश खोमणे, पुष्पावती इंगळे हे सदस्य निवडून आले.
या सोसायटीवर अनेक वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. परंतु, यावेळी शिवसेनेने जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीवर भगवा फडकावून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे कामकाज लेखापरीक्षक श्रेणी- २ (सहकारी संस्था) एस. एस. कुलकर्णी यांनी पाहिले.
या निवडीवेळी सरपंच कैलास म्हेत्रे, माजी उपसरपंच गोविंद इंगळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अंकुश इंगळे, प्रमोद इंगळे, राहुल इंगळे, दत्तात्रेय म्हेत्रे, दत्तात्रेय इंगळे, सतीश इंगळे, नितीन इंगळे, संतोष नेवसे, विकास म्हेत्रे, अनिकेत नवले ,प्रवीण इंगळे, श्रीधर इंगळे, सुरेश म्हेत्रे, राहुल चौरे, योगेश जगताप, कैलास फ. इंगळे, विकास इंगळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

SCROLL FOR NEXT