पुणे

विवाहितेच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना मारहाण

CD

राजगुरुनगर, ता. ६ : पुणे-नाशिक महामार्गावरील चांडोलीच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुण विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून रुग्णालयातील एका डॉक्टरला नातेवाइकांनी मारहाण केल्याची, तसेच रुग्णालयाच्या काचा फोडल्याची घटना बुधवारी (ता. ६) घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलोफर शमसुद्दीन मोमीन ( वय २८, रा. तुरुकवाडी, पो. कडूस, ता. खेड ) या विवाहितेने चार दिवसांपूर्वी घरगुती भांडणातून विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी चांडोली येथील जीवनरक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बुधवारी या महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी डॉ. रमेश शेजूळ यांना सलाईन अडकावण्याच्या लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याबरोबर रुग्णालयाच्या काचा फोडल्या. डॉक्टर गंभीर जखमी असून चाकण येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

खेड पोलिस ठाण्यात महिलेच्या मृत्यूच्या घटनेची नोंद दाखल करण्यात आली आहे. तसेच मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT