पुणे

राजगरुनगरला पहिलीच्या विद्यार्थ्यांचे ढोल लेझीमच्या गजरात स्वागत राजगरुनगरला पहिलीच्या विद्यार्थ्यांचे ढोल लेझीमच्या गजरात स्वागत

CD

राजगुरुनगर, ता. २५ : येथील (ता. खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले होते. पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ढोल लेझीमच्या गजरात व वाद्यांच्या साथीत स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्रवेशद्वारामधून फेटा बांधून आणि प्रांगणामध्ये गुलाब पुष्प देऊन मिरवणुकीने त्यांना शाळेत आणण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सर्व मैदान दुमदुमून गेले होते. पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षक वृंद यांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले. मेळाव्याचे नियोजन शिक्षक द. मा. पिंगळे, कांचन वायाळ, रवींद्र मावळे, स्मिता पवळे, अनिल साकोरे, जयसिंग उकिरडे, गीता सांगडे यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रंजना घनकुटे, अलका सांगडे, रशिद तडवी, पंचायत समिती शिक्षण विभागातील विषय तज्ञ दयानंद शिंदे, विलास जाधव, अंगणवाडी सेविका नयना वाळुंज आदी उपस्थित होते. शाळेच्या व्हरांड्यात आठ टेबल लावण्यात आले होते. भाषिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास, शारीरिक क्षमता, सामाजिक विकास, पालकांना मार्गदर्शन इत्यादी विषयांचा त्यांत समावेश होता.
--------------

01789

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT