पुणे

भोर पंचायत समितीकडून विकासकामांसाठी सव्वा कोटी

CD

नसरापूर, ता. ७ ः भोर पंचायत समिती तालुकास्तरीय नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अबंधित व बंधित निधीअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षासाठी तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांकरिता १ कोटी २२ लाख ३७ हजार ५४० रुपये निधीस मान्यता देण्यात आली आहे.
भोरचे पंचायत समिती सभापती लहूनाना शेलार, उपसभापती रोहन बाठे व सदस्या पुनम अमोल पांगारे यांच्या बैठकीमध्ये सर्वानुमते पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सन २०२१-२२ मधील प्राप्त पंचायत समिती स्तरावरील १० टक्के निधी अंतर्गत तालुका विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली असून त्यामध्ये स्वच्छता अंतर्गत बंदिस्त गटार, कचरा कुंडी, घंटागाडी आदी कामांसाठी ३८ लाख २४ हजार २२६ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर पाणी पुरवठ्यामधील विविध गावांना विंधन विहीरी स्मशानभूमीमध्ये पाण्याची टाकी बांधणे, जलशुद्धीकरण यंत्र बसवणे आदी कामांसाठी ३८ लाख २४ हजार २२६ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर अबंधित कामासाठी म्हणजे रस्ते, अंतर्गत रस्ते, क्रीडांगणे, गार्डन बेंच, सोलर दिवे, हायमास्ट दिवे, महिला अस्मिता भवन, ब्लॉक बसवणे, वाचनालय, चावडी ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती, नाला संरक्षणभिंत आदी कामांसाठी ४५ लाख ८९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व निधींचा वापर मार्च २०२२ च्या आत मध्ये करावयाचा असून या निधीच्या गावानुसार वापराचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
खर्चाच्या सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावाचे सूचक सभापती लहूनाना शेलार तर उपसभापती रोहन बाठे व सदस्या पुनम पांगारे अनुमोदक होत्या. सभापती शेलार यांनी माहिती देताना सांगितले की, तालुक्यातील एकूण २१ गावांमध्ये अबंधित निधी अंतर्गत कामांचे नियोजन करण्यात आले आहे. तर एकूण ४० गावांमध्ये तसेच पंचायत समितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण संच बसवण्यासाठी बंधित निधी अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT