पुणे

कांजळे येथील काळूबाईची यात्रा रद्द

CD

नसरापूर, ता. ११ ः कोरोना व ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी कांजळे (ता. भोर) येथील प्रसिद्ध काळूबाई देवीची यात्रा रद्द केली असून मंदिर व परिसरात १४४ कलम लागू केले आहे. या परिसरात गर्दी व वाहनांची वर्दळ करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
कांजळे येथील काळूबाईची यात्रा पौष पौर्णिमेपासून पुढील पंधरा दिवस चालते. येत्या १७ जानेवारीला पौष पौर्णिमा असून तेथून पुढे पंधरा दिवस यात्रा चालणार होती. या यात्रेस मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात. तसेच भाविक नैवेद्य तयार करणे, जेवणाच्या पंगती घालणे यासाठी गर्दी करतात. कोरोना व ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमिवर भोरचे प्रांताधिकारी कचरे यांनी आदेश जारी करत यात्रा रद्द केली आहे. १७ जानेवारीपासून १ फेब्रुवारीपर्यंत या भागात संचारबंदी लावण्यात आली आहे, तसेच परिसरातील लॉज व इतर ठिकाणी राहण्यास व यात्रा साजरी करण्यास देखिल बंदी घालण्यात आली आहे.
मंदिरात यात्रेच्या दिवशी फक्त पुजारी धार्मिक कार्यक्रम करतील. राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांनी या बाबत भाविकांनी यात्रा रद्द झाल्याने या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले असून सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT