पुणे

बनेश्वरमधील प्रस्तावित कचरा डेपो रद्द

CD

नसरापूर, ता.१६ : पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आराखड्यानुसार नसरापूर येथील बनेश्वर मंदिरापासून २०० मीटर अतंरावर प्रस्तावित कचरा डेपो व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे व खासदार सुप्रिया सुळे, नसरापूरमधील ग्रामस्थ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमआरडीए संदर्भातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी या तीनही तालुक्यातील काही नागरिक व पीएमआरडीएचे दिवसे यांची पुणे येथील प्राधिकरणाच्या औंधच्या कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड, पीएमआरडीएच्या नवनिर्वाचित सदस्या प्रियांका मांगडे, भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाठे,र मेश थोरात, नसरापूरचे माजी सरपंच हनुमंत कदम, निवृत्त पोलिस अधिकारी यशवंत कदम, रवींद्र शेडगे, पांडुरंग कदम यांच्यासह वेल्हे व मुळशी तालुक्यातील नागरिकही उपस्थित होते.

प्रस्तावित कचरा डेपोमुळे बनेश्वर मंदिराचे पावित्र्य कमी होणार होते. यामुळे तो रद्द करण्याची मागणी आयुक्त दिवसे यांनी मान्य केली. या प्रकल्पासाठी दुसरी जागा शोधण्यात येणार आहे.
या बरोबरच बैठकीमध्ये वेल्हे तालुक्यातील नागरिकांनी नसरापूरमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्याची मागणी केली. त्यासाठी विकास आराखड्यानुसार केळवडे व नसरापूर शिवेवरील प्रस्तावित ३० मीटर रस्त्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे ठरवण्यात आले.

चेलाडी ते शिवगंगापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण
यावेळी नसरापूरमधील मुख्य बाजारपेठेचा चेलाडी ते शिवगंगा नदीपर्यंतचा रस्ता रुंद होऊन त्याचे काँक्रिटीकरण, सुशोभीकरण, बंदिस्त गटार, पादचाऱ्यांसाठी फुटपाथासह प्राधिकरणाच्या वतीने केला जावा, अशी मागणी विक्रम खुटवड यांनी केली होती. त्यासाठी खासदार सुळे यांनी देखील स्वतंत्र पत्र देत या रस्त्या बाबत कार्यवाही व्हावी असे कळवले होते. त्या बाबत देखील आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पीएमआरडीएच्या वतीने हा रस्ता केला जाईल, अशी ग्वाही दिली.

बैठकीमध्ये ठरलेले महत्त्वाचे मुद्दे
१. विकास आराखड्यावर आलेल्या हरकतींची एक महिन्यात सुनावणी
२. रस्ते, क्रीडांगण, शाळा व इतर आरक्षणाबाबत वेगवेगळ्या समित्यांसमोर हरकतींची सुनावणी
३. तक्रारदारांना बोलावणार त्यासाठी पत्र, ई मेल,फोन व्दारे आमंत्रण देणार.
४. कोणीही बाजू मांडण्यासाठी वंचित राहणार नाही

02244

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Rashid Khan: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर रशीद खानचा तीव्र संताप; म्हणाला, 'रमजानच्या पवित्र महिन्यात ही क्रूरता...'

IPL Kisse: वानखेडेवर शाहरुखचा संताप! विलासराव देशमुखांचा एक निर्णय अन् 5 वर्षांची बंदी, 2012 मधील IPL सामन्यात काय घडलं होतं?

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT