पुणे

बनावट कागदपत्राव्दारे देवस्थानजमिनीची विक्री

CD

नसरापूर, ता. २० ः भोंगवली (ता. भोर) येथील लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टच्या जमिनीचे बोगस खरेदीखत करून विक्री केल्याप्रकरणी २०१९ सालामधील तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांसह १३ जणांविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोंगवलीचे विद्यमान ग्रामसेवक जकाप्पा बिराजदार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक राहुल धोंडीबा शेलार, सरपंच निलम संदीप उल्हाळकर, उपसरपंच लीला उत्तम बाठे, सदस्य भगवान एकनाथ भांडे, जीवन हनुमंत निगडे, राजेंद्र विश्वास खोमणे, गणेश दत्तात्रेय सुर्वे, मनिषा संतोष शेडगे, चांदणी शिवाजी लंके, इंदूबाई संपत लंके व विक्री करणारे संतोष अर्जुन नलावडे, खरेदी करणारे दीपक गुलचंद चव्हाण, नीता दीपक चव्हाण सर्व (रा.भोंगवली ता.भोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ पुढील तपास करत आहेत.

प्रहार संघटनेचे भोर तालुकाध्यक्ष संतोष मोहीते यांनी याबाबत गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारदार मोहीते यांनी सांगितले की, भोंगवली येथे लक्ष्मीनारायण देवस्थानची सव्वा आठ गुंठे इतकी जमीन आहे. त्या जमिनीचे वहिवाटदार देवस्थान ट्रस्ट, पंच व सरपंच भोंगवली अशी ग्रामपंचायतीला नोंद असताना गावामधील संतोष नलावडे यांनी त्यातील एक गुंठा जमिनीवर खोट्या कागदपत्राव्दारे स्वतःची वारस नोंद केली व ती एक गुंठा जमीन दीपक गुलचंद चव्हाण व नीता दीपक चव्हाण यांना विक्री केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT