पुणे

आळंदीत गतिरोधक बसविण्याची मागणी

CD

आळंदी, ता. २९ : राजकीय जोडे बाजूला ठेऊन शहरात अपघातग्रस्त रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याची मागणी आळंदी नागरी कृती समितीच्या युवकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आज भेटून केली.
रस्त्यांचे काँक्रिटीकरण पालिकेने केल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहने जोरात चालविली जात आहे. मुख्य रस्ते ओलांडताना महिला, बालके, वृद्धांना जीव मुठीत धरून चालावा लागतो. त्यातच रांजणगाव, शिक्रापूर, शिरूर, चाकण, तळेगाव, भोसरी औद्योगिक भागात जाणारी आणि पुण्याला जाणारी वाहनेही आळंदीमार्गेच ये-जा करण्याचे प्रमाण वाढले. परिणामी अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. मागील महिन्यात अनेक नगरसेवकांनी स्वतःच्या मर्जीनुसार गल्लीबोळात गतिरोधक बसविले. मात्र मुख्य रस्ते गतिरोधक विनाच आहेत. यामुळे शहरातील नागरिकांना रस्त्यावरून चालणेही दुरापास्त झाले. यामुळे प्रमुख रस्त्यांवर योग्य आकाराचे गतिरोधक बसविण्यासाठी आळंदीकरांनी आज मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी संदीप नाईकरे, रवींद्र रणदिवे, अजय तापकीर, संतोष भोसले, पांडुरंग घुंडरे यांच्यासह युवक निवेदन देताना उपस्थित होते. दरम्यान, मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून व रस्त्याची पाहणी करून गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT