पुणे

भामचंद्र विद्यालयात ५३१ विद्यार्थ्यांना लस

CD

आंबेठाण, ता. ९ : भांबोली (ता. खेड) येथील भामचंद्र विद्यालयात ५३१ मुलांचे लसीकरण करण्यात आले. विद्यालयात २० किलोमीटर अंतरावरील शिवे, वहागाव, गडद येथून विद्यार्थी येतात. त्यामुळे सुमारे दहा ते बारा गावातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य संजय बोरकर यांनी दिली.
या प्रसंगी भांबोलीचे सरपंच भरत लांडगे, वासुलीचे उपसरपंच विक्रम पाचपुते, मोहन पाचपुते, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे आदी उपस्थित होते.
करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वराळे व कोरेगाव आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी सुशील पांडे, अवधूत डेरे, आरोग्य सेवक हरिदास टेकवडे, भारती राक्षे, आरोग्य मदतनीस अरुणा पानमंद, प्रियांका तनपुरे, निर्मला राऊत, अनिता गाळव आदींनी लसीकरण पूर्ण केले.
यावेळी नववी ते बारावीच्या (पंधरा ते अठरा वयोगट) ५३१ विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंध कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. या कामी विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आरोग्य विभागाला सहकार्य केले. यात रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन आदी कामात मदत केली. यावेळी विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर ग्रामपंचायत वासुली आणि भांबोली यांच्या वतीने बिस्कीट वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

Latest Marathi News Live Update : डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT