पुणे

अखेर निबंधक कार्यालयाचे स्थलांतर

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१४ : येथील (ता.शिरूर) ग्रामपंचायतीच्या जागेत असलेले दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर सोमवारी (ता.१४) झाले असून, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशानुसार सदर कार्यालयाचे स्थलांतर केल्याची माहिती येथील दुय्यम निबंधक अनिता कणसे यांनी सांगितली. पोलिसांच्या संरक्षणामुळे कार्यालयाचे कामकाज सुरळीत चालू झाले.

कार्यालयाचे स्थलांतर करू नये म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ व शिरूर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा चेतना ढमढेरे आणि काही पदाधिकारी व ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार येथील कार्यालयाचे स्थलांतर स्थगित केले होते. दरम्यान, ग्रामपंचायत इमारतीतून गुरुवर्य ॲड.बी.ई. आव्हाड संकुल वाणिज्य इमारत तळेगाव ढमढेरे येथील इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच जुन्या कार्यालय परिसरातील दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आंदोलनकर्ते निषेध नोंदवून निवेदन देण्यासाठी येथील नवीन इमारतीत स्थलांतर झालेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असता काहीसा ताणतणाव निर्माण झाला होता. मात्र, दुय्यम निबंधक अनिता कणसे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिक्रापूर पोलिस ठाण्याकडे लेखी पत्राद्वारे संरक्षण मागितले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी आंदोलनकर्त्या आरती भुजबळ, चेतना ढमढेरे आणि काही ग्रामस्थांनी पूर्वीच्या जागेतून ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कार्यालयाचे स्थलांतर केले याचा निषेध करून, नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक आणि शिक्रापूर पोलिस स्टेशनला लेखी निवेदन दिले. यावेळी नवीन इमारतीत काहीकाळ ताणतणाव निर्माण झाला होता.

स्थलांतर केलेल्या प्रशस्त नवीन इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय सुरळीत सुरू झाले आहे. इमारतीसमोर प्रशस्त पार्किंगची सुविधा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्प व व्हिल खुर्चीची सुविधा, पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा, नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा आदी सुविधा आहे..
-अनिता कणसे, दुय्यम निबंधक

02911

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

SCROLL FOR NEXT