पुणे

शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

CD

रांजणगाव गणपती, ता. ७ ः पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी “शेतकरी उत्पादक ते कृषी निर्यातदार’’ विषयक प्रशिक्षण पुण्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
२८ जानेवारी व ३० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या प्रशिक्षणात शिरूर तालुक्यातील शंभर शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवायचा असल्याने शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन शिरूर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे. या प्रशिक्षणासाठी निर्यातदार शेतकरी निवड निकष निर्यातदार युवक हा आत्मा अंतर्गत शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असावा, कमाल ४० वर्ष वयोमर्यादा, इयत्ता दहावी पास इंग्रजी वाचता लिहिता येणारा, व्यवसाय करण्याची इच्छा असणारा शेतकरी असावा, शेतकरी निवड निकषानुसार तालुक्याकरिता प्रति गाव एक इच्छुक, पात्र शेतकरी यानुषंगाने तालुक्यास प्राप्त लक्षांकानुसार शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. निर्यातदार प्रशिक्षणाच्या प्रमुख बाबी निर्यात संधी, ट्रेसेबिलिटी विविध नेट्स, विपणन आणि ब्रँडिंग, निर्यात प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व प्रमाणीकरण, कृषी निर्यात अर्थ व्यवस्थापन व कृषी निर्यात योजना प्रशिक्षण पूर्व नोंदणी आवश्यक आहे. शिरूर तालुक्यातील इच्छुक, पात्र, निर्यातदार शेतकऱ्यांनी देण्यात आलेल्या गुगल फॉर्मव्दारे माहिती भरून पूर्व नोंदणी करावी, असे ही ढवळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT