पुणे

कोंढापुरीत ‘डिजिटल मार्केटिंग’ विषयावर ऑनलाईन कार्यशाळा

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २४ : कोंढापुरी (ता. शिरूर ) येथील आर. एम. धारीवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूलमध्ये ‘डिजिटल मार्केटिंग’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कॉर्पोरेट डिजिटल मार्केटिंगचे रोहित देव यांनी कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले.
‘‘उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुम्ही मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकता. तुमच्या ग्राहकांवर लक्ष्य केंद्रित करून त्याप्रमाणे मोहिमेची आखणी केल्यास गुंतवणूकीवर उत्तम परतावा मिळेल, असे देव यांनी सांगितले. तसेच, वर्ड प्रेस प्लॅटफॉर्मवर वेबसाईट डिझाईन करण्याबाबत, उत्पादनाची मीडियावर जाहिरात करण्याबाबत त्यांनी माहिती दिली. गूगलच्या माध्यमातून प्रॉडक्ट सेल रिपोर्ट तयार करता येतो. गुगल टूल्सच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करता येते. विविध कोर्सेस चालविता येतात. विद्यार्थी नोकरी शोधू शकतात.’’ ‘डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील ग्राहकांची अपेक्षा’ अशा अनेक विषयांवर त्यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी संचालक अनिता माने, प्रा. झेड. एस. मुल्ला, आणि एम. बी. ए. चे प्राध्यापक, विद्यार्थी व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT