Crime
Crime 
पुणे

महागडी गाडी, नेत्यासारखा पेहराव; पवारांच्या कार्यक्रमात चोरी करणाऱ्यास अटक

CD

टाकळी हाजी, ता. १३ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील २५ डिसेंबर रोजीच्या दौऱ्यावेळी मलठण (ता. शिरूर) येथे चोरीचा प्रकार घडला होता. त्यातील एक आरोपी पकडल्याची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते थांबले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन रमेश सोन्याबापू गिते यांची तीन तोळ्याची चैन, नरेंद्र निवृत्ती वाव्हळ यांची दीड तोळ्याची चैन, शशिकांत
वाव्हळ यांची ५० हजार रुपयांची रोकड व नाना फुलसुंदर यांचा मोबाईल चोरीला गेला होता. याबाबत गिते यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार परिसरात सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांनी केली. त्यावेळी हे सर्व आरोपी करड्या रंगाच्या शेवरलेट कंपनीच्या मोटारीमधून आले होते.

तसेच, ओळख उघड होऊ नये म्हणून नेत्यासारखा पेहराव केल्याचे आढळून आले. या संशयिताचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील सहापैकी ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कल्याण जाधव यास शेवरलेट मोटारीसह (क्र. एमएच २० ईई ०४३१) गांधीनगर-बीड येथून अटक केली. त्याचे अन्य साथीदार फरारी झाले आहेत. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT