पुणे

पोलिस भरती परीक्षेसाठी मैदानात तोतया उमेदवार

CD

दौंड, ता. ८ : राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) सशस्त्र पोलिस शिपाई पदाच्या भरती परीक्षेत मैदानी चाचणी परीक्षेकरिता बनावट ओळखपत्रासह तोतया उमेदवार उभा केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी माहिती दिली की, पोलिस भरतीसाठी अर्ज करणारा संदीप रामू राजपूत (रा. लालवण, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) हा परीक्षार्थी आणि त्याचा अज्ञात तोतया परीक्षार्थी साथीदार, अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दौंड शहरातील एसआरपीएफ गट क्रमांक सात येथील मैदानावर कुसडगाव (ता. जामखेड, जि. नगर) येथील एसआरपीएफ गट क्रमांक एकोणीसकरिता सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियाअंतर्गत मैदानी चाचणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. संदीप राजपूत व त्याच्या साथीदाराने भरती अर्जावर आणि मैदानी चाचणी ओळखपत्रावर दोन वेगळे छायाचित्र लावण्यासह बनावट स्वाक्षरी केली होती. चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर आज एसआरपीएफचे पोलिस निरीक्षक महेंद्र कोरे यांनी फिर्याद दाखल केली. सहायक निरीक्षक तुकाराम राठोड पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ८ चेंडूंत ३ विकेट्स! अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड अपयशी... जेकब डफीने सामन्याला दिली 360 डिग्री कलाटणी

Pune Crime : देवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार; भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Balapur Crime : दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

SCROLL FOR NEXT