पुणे

कासारी गावात तीव्र पाणीटंचाई

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २९ : कासारी (ता. शिरूर) गावात उन्हाळ्याच्या तोंडावरच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील शासकीय इनामाच्या तळ्यात त्वरित चासकमानच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सुनीता भुजबळ यांनी शिक्रापूर येथील चासकमान पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, कासारी गावात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत असून, ग्रामस्थांचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे सरपंच भुजबळ यांनी सांगितले.
येथील शासकीय इनामाच्या तलावाशेजारी विहीर असून या विहिरीतून ग्रामपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजना आहे. परंतु, सध्या हा तलाव कोरडा ठणठणीत पडल्याने विहिरीची पाणीपातळी खोलवर गेल्याने नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. येथील शासकीय तलावात त्वरित चासकमानच्या पाण्याचे आवर्तन सोडून ऐन उन्हाळ्यातील पाणी टंचाई दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे सरपंच भुजबळ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

SCROLL FOR NEXT