पुणे

''इस्कॉन''ला अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

CD

सासवड, ता. २५ : इस्कॉन संस्थेला राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राजभवन, मुंबई येथे संस्थेचे मार्गदर्शक सुंदर वर प्रभू यांनी तो स्वीकारला.

पुरंदर व वेल्हे तालुक्यामध्ये भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार, आध्यात्मिक ज्ञान शास्त्रशुद्ध पद्धतीने देणाऱ्या इस्कॉन संस्थेने ग्रामीण भागातील केंद्रांमार्फत शेती, पशुपालन व आरोग्य या क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कार्य केले आहे. देशी गोपालन, शेण, गोमूत्र व दूधापासून उपपदार्थ तयार करणे व तसेच सेंद्रिय शेती, गटशेती, मूल्यशिक्षण देण्यात पुढाकार घेतला आहे. गोरेगाव (इस्ट) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थेच्या ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'' पुरस्कार समितीतर्फे हा गौरव करण्यात आला. यावेळी कोश्‍यारी, समितीचे अध्यक्ष सागर धापटे व पदाधिकारी, इस्कॉन संस्थेचे प्रमुख सेवक हजर होते, अशी माहिती शासनाच्या कृषी विभागाचे मुख्य गुण-नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांनी दिली.

संस्था वेल्हा व पुरंदर तालुक्यामध्ये दूध यापासून विविध उपपदार्थ तयार करणे व त्याचे प्रशिक्षण शेतकरी बांधवांना देण्याबरोबर ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देणे जेणेकरून त्यांचे चारित्र्यामध्ये सुधारणा घडेल यासाठी प्रयत्न चालू आहेत.

02418

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT