पुणे

लाच मागणाऱ्याला पोलिसाला अटक करण्याची मागणी

CD

चाकण, ता. २ : चाकण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक सोमनाथ सुरेश झेंडे याच्यावर एकाकडे लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या फरारी आहे. त्याला अटक करून त्याची सखोल चौकशी करून निलंबन करावे अशी मागणी नागरिकांची आहे.
चाकण (ता. खेड) येथील पोलिस ठाण्यात गेल्या पाच वर्षात पाचवर पोलिस अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणात अडकले आहेत. महाळुंगे पोलिस चौकीतील एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर लाच प्रकरणी कारवाई झाली होती. चाकण पोलिस ठाणे, महाळुंगे पोलिस चौकी औद्योगिक वसाहत परिसरात व विकसित झालेल्या भागात असल्याने येथे नेमणूक होण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. येथे गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेणे, काहींना खोट्या गुन्ह्यात अडकवून पैसे मागणे असे प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहे. असे प्रकार घडू नयेत म्हणून लाचखोरांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि उद्योजक वर्गातून जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT