पुणे

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध ऑनलाइन स्पर्धा-VDM21B0198

CD

वडगाव मावळ, ता. २२ : वडगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत ऑनलाइन विविध स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात लोक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात २२ ते २४ डिसेंबर दरम्यान ५ वी ते १२ वी गटासाठी निबंध स्पर्धा, १ ली ते ५ वी, ५ वी ते ११ वी व १२ वी ते खुल्या गटांसाठी चित्रकला स्पर्धा, खुल्या गटासाठी वक्तृत्व, जिंगल स्पर्धा व लघुपट शॉर्ट मूव्ही स्पर्धेचा समावेश आहे. पर्यावरण संवर्धन, आपले वडगाव, हरित वडगाव, पंचतत्वांचे संरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यापासून कंपोष्ट खत निर्मिती, हागणदारी मुक्त शहर, वृक्षारोपण, जलसंवर्धन, पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, शहर सुशोभीकरण, स्वच्छ सर्वेक्षण हे स्पर्धेचे विषय आहेत. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे दोन हजार रुपये, दीड हजार रुपये व एक हजार रुपये या प्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझमध्ये अमेरिकेचा हल्ला, मालवाहू जहाजाला केलं लक्ष्य, पाच जणांचा मृत्यू; इराणी मीडियाचा मोठा दावा...

Petrol-Diesel Price: निवडणुकांचे निकाल लागले… आता LPG नंतर पेट्रोल-डिझेलही महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Tamil Nadu Election Result : तिरुपत्तूरमध्ये रंगला हायव्होल्टेज ड्रामा! फक्त 1 मताने ठरला आमदार; थलपती विजयच्या उमेदवारानं मंत्र्याचा पराभव करत रचला इतिहास

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्याच्या मध्यभागी ‘मृत्यूचे खांब’; हर्सूल-जटवाडा मार्गावर वाहनचालकांच्या जिवाशी खेळ

SCROLL FOR NEXT