पुणे

विजयस्तंभ अभिवादन दिन काळजी घेऊन साजरा करू या -KBM21B0205

CD

केसनंद, ता. १५ : येत्या १ जानेवारीला पेरणेफाटा (ता. हवेली) येथे होणारा अभिवादन कार्यक्रम सर्वांच्या सहभागातून उत्साहात मात्र, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्य काळजी घेऊन साजरा करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
पेरणे (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी सर्व विभागांचे नियोजन व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पेरणे येथे विजयस्तंभस्थळी घेण्यात आली. विजय स्तंभस्थळी अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व बांधवांसाठी सीसीटिव्ही, सुरक्षित वातावरणासह पार्किंग, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन यासह सर्वतोपरी सेवासुविधा पुरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही डॉ. देशमुख यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असून लशीच्या दोन डोससह सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.’’
पेरणे ग्रामपंचायतीच्या सहभागातून या स्थळाचा विकास व्हावा, विविध सुविधांसाठी ग्रामपंचायतीला निधी द्यावा तसेच पथदिव्यांचे वीजबिल शासनाने भरावे, अशी मागणी सरपंच रूपेश ठोंबरे यांनी केली.
यावेळी बैठकीला पुण्याचे सहआयुक्त रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, रोहीदास पवार, किशोर जाधव, तृप्ती कोलते, प्रशांत शिर्के तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT