पुणे

शंभू राजांच्या समाधिस्थळी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

CD

कोरेगाव भीमा / केसनंद, ता. १२ : छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या देदीप्यमान कारकिर्दीला साजेसे असे भव्य स्मारक उभारणी व विकास आराखड्यावर चर्चेसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वढू-तुळापूरला भेट देत शंभूराजांच्या समाधिस्थळ परिसरात पाहणी करून ग्रामस्थांशीही चर्चा केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळी भव्य स्मारक उभारणी तसेच वढू-तुळापूर परिसराच्या विकासासाठी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास तत्त्वतः मंजुरी दिली. तसेच विधिमंडळ अधिवेशनातही स्मारक व परिसर विकासासाठी १५० कोटींच्या निधीबाबत घोषणा केली. त्यानंतर प्रशासनाकडूनही या कामास गती मिळाली आहे.
आज जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार अशोक पवार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण तसेच संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वढू बुद्रुक तसेच तुळापूर येथे भेट देवून समाधिस्थळी दर्शन घेत समाधिस्थळ व परिसराची पाहणी केली. तसेच विकास आराखड्यांतील अंतर्गत रस्त्यांसह विविध नियोजित सोयीसुविधांसह इतर बाबी आणि त्यासाठी आवश्यक व प्रत्यक्षात उपलब्ध असलेली जागा, भीमानदी घाट परिसर याबाबत वास्तुविशारद तसेच ग्रामस्थांशीही चर्चा केली.
दरम्यान, गेले अनेक दिवस शंभू भक्तांच्या मनात असलेल्या छत्रपती संभाजीराजांच्या ऐतिहासिक स्मृतिस्थळ विकासाचे स्वप्न उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून साकार होत असल्याबद्दल शंभूभक्त तसेच वढू-तुळापूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच याकामी आवश्यक असलेल्या सर्वतोपरी मदतीची ग्वाहीही वढू-तुळापूर ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकारभाऱ्यांनी दिली. तर यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शिरूर व हवेलीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तसेच वढू व तुळापूरचे आजी माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT