पुणे

शंभूराजेंच्या स्मारक प्रवेशद्वाराचा रस्ता प्रशस्त होणार

CD

केसनंद, ता. ३० : श्रीक्षेत्र तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकासमोरील प्रवेशद्वाराचा रस्ता स्थानिक दोन शंभुभक्तांनी जागा दिल्याने तसेच आमदार अशोक पवार यांनी १० लाखांचा निधी दिल्याने आणखी प्रशस्त होणार आहे.
तुळापूर (ता. हवेली) येथे आळंदी रस्ता ते छत्रपती शंभूराजे समाधिस्थळ या दरम्यानचा प्रवेशद्वार रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी तुळापूरचे माजी सरपंच रूपेश शिवले यांनी तसेच शेजारील उद्योजक प्रमोद देशमुख यांनीही स्वत:ची जागा रस्त्यासाठी दिल्याने रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचा प्रारंभ नुकताच आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
या रस्त्याच्या कामाच्या आड येणारा वीजेचा खांबही तातडीने काढून तेथे भूमिगत केबल टाकण्याच्या सूचना आमदार पवार यांनी महावितरणचे अधिकारी राठोड यांच्याशी चर्चा करून दिल्याने रस्त्याचे काम अधिक गतीने मार्गी लागणार आहे.
यावेळी आमदार पवार पुढे म्हणाले, ‘‘वढू-तुळापूरला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी सुमारे ५६ कोटींचा निधी दिला असून वढू-तुळापूर येथे छत्रपती शंभूराजांच्या स्मारकांसह परिसर विकासासाठी सरकारने २५० कोटींचा निधी मंजूर केल्याने वढू-तुळापूर परिसराचा कायापालट होणार आहे.’’
या प्रसंगी शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, दूध संघ संचालक स्वप्नील ढमढेरे, प्रदिपभाऊ कंद, सरपंच गुंफा इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले, माजी सरपंच रूपेश शिवले, लोचन शिवले, जयवंतराव शिवले, गणेश पुजारी, संतोष शिवले, पवन खैरे, डी. एस. शिवले, माधुरी वाळके, सतीश थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. तुळापूर सोसायटीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब जगताप यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT