पुणे

कोरोनाचा नियमांचे पालन व्हावे : जगताप सासवड नगरपालिकेत बैठक; विनामास्क फिरणाऱ्यांना होणार पाचशे रुपयांचा दंड

CD

सासवड शहर, ता. ७ : ‘‘कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घ्यावे. तसेच १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे प्रशासनाने तातडीने नियोजन करावे. पुरंदर तालुक्यात कोरोना संसर्ग अद्याप आटोक्यात असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

सासवड नगरपालिकेत व्यापारी, डॉक्टर, माध्यमिक विद्यालये आणि कॉलेजचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. मुख्याधिकारी निखिल मोरे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किरण राऊत आदी या वेळी उपस्थित होते.
विनामास्क फिरणाऱ्यांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जाईल. गर्दी झाल्यास संबंधित कार्यालयाच्या आस्थापनेवर आणि दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे. दुकानदारांनी ग्राहकांना मास्क शिवाय दुकानात प्रवेश देऊ नये, तसेच संबंधित सूचनांचे फलक लावावेत. तसेच पान टपरीच्या आजूबाजूला थुंकल्याचे आढळल्यास थुंकणारा आणि टपरी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मोरे व घोलप यांनी सांगितले.
नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टस्निंगच्या पालनाबरोबर स्वतःचे, कुटुंबाचे आणि व्यापाऱ्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

IND vs WI: भारताविरुद्धच्या T20-वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; धाकड खेळाडूची झाली दमदार वापसी, पहा संपूर्ण संघ

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज! मध्य रेल्वेसह हार्बरवर २२ विशेष लोकलची घोषणा; कधी कोणती धावणार?

बोलता-बोलता सलमान खानच्या छातीत उठल्या तीव्र कळा ; पाणी मागितलं, डॉक्टरांना बोलवण्यास सांगितलं, बिग बॉसच्या घरातील Viral Video

Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; 500 मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात...

SCROLL FOR NEXT