पुणे

कर्मयोगी कारखान्याकडून ४ लाख टन उसाचे गाळप

CD

इंदापूर, ता. १ : बिजवडी-महात्मा फुलेनगर (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२२ च्या गळीत हंगामात शुक्रवारअखेर (ता. ३१) ४ लाख ११११ टन उसाचे गाळप पूर्ण केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी दिली.
या हंगामात कारखाना प्रतिदिन सरासरी ९ हजार टनांहून अधिक क्षमतेने उसाचे गाळप करत आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती, इथेनॉल निर्मिती करणारे प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादकांशी गटनिहाय बैठका घेऊन संवाद साधला. त्यामुळे गाळप हंगामात ऊस गाळपाचे प्रमाण वाढले आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, शांतिलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT