पुणे

सावता परिषदेस पाठबळ देणार : भरणे

CD

इंदापूर, ता. ३१ : ''''सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी संघटनेच्या माध्यमातून राज्यात मोठे काम केले आहे. संत सावता महाराज यांच्यासाठी प्रसिद्ध अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ते सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहेत. परिषदेने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व वैयक्तिक मला मोठी मदत केली आहे. त्यामुळे सावता परिषदेस माझे नेहमी पाठबळ राहील,'''' अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

भरणे यांच्या हस्ते भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे सावता परिषदेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू म्हणाले, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्यामुळे संत सावता महाराज संजीवनी समाधी तीर्थक्षेत्राचे महत्त्व सर्वांना पटल्याने या तीर्थक्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे.
यावेळी सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे, युवक आघाडी तालुकाध्यक्ष अमर बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, तालुका उपाध्यक्ष विष्णू झगडे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र भोंग, इंदापूर सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, तालुका संघटक सुहास बोराटे, पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, ॲड. लक्ष्मण शिंगाडे, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, छत्रपती साखर कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक कोंडिबा भोंग, विकास सोसायटीचे संचालक महादेव शेंडे, अजय गवळी उपस्थित होते.

04232

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT