पुणे

मत्स्य शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड -MAC21B0274

CD

मंचर, ता. २२ : ‘‘केंद्र व राज्य मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्य शेतकरी समृद्ध होण्यासाठी व मत्स्य व्यवसाय वाढीसाठी शेतीप्रमाणे बँकेच्या माध्यमातून खेळत्या भांडवल देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात दहा हजार मच्छिमार व व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांना प्रत्येकी एक लाख ६० हजार रुपये कर्ज विनातारण किसान क्रेडीट कार्ड वाटप मोहीम प्रक्रिया सुरु केली आहे. याचा लाभ मत्स्य शेती करणाऱ्यांनी घ्यावा, ’’ असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. २१) किसान क्रेडीक कार्ड उपक्रम अंमलबजावणीसाठी आयोजित केलेल्या मत्स्य शेतकरी मेळाव्यात वाघमारे बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र घोडेगाव शाखेचे अधिकारी राकेश कुमार, मंचर शाखेचे सतीश वाडेकर, युनियन बँकेचे अधिकारी दिनेश शेडगे, पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी एल. बी थोरात, ग्रोवेल मत्स्य खाद्य कंपनीचे अधिकारी जयप्रकाश तिवारी यांच्यासह मत्स्य शेती करणारे ४० शेतकरी उपस्थित होते.
यावेळी एस. के. फिशरीजचे संतोष खामकर, सुमित शिनगारे व मयूर भोर यांच्या हस्ते अधिकारी व मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्डचे अर्ज विहित नमुन्यात भरून घेण्यात आले.
वाडेकर म्हणाले, ‘‘आतापर्यंत बँकांमार्फत किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना दिले जात होते. यापुढे मत्स्य व्यावसायिकांना क्रेडीट कार्ड मिळणार आहे. कमीत कमी कागदपत्रे आणि लवकर सहज सोप्या पद्धतीने कर्ज दिले जाईल. कर्ज रक्कम वेळेत भरावी. तुमची पत वाढल्यास बँकेच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी अधिकचे कर्ज बँक देईल.’’

मत्स्य शेती करणाऱ्यांना बँकेचा सात टक्के व्याजदर आहे. पण, एक वर्ष कर्ज वापरून वेळेत भरले; तर तीन टक्के व्याज केंद्र सरकार व चार टक्के व्याज राज्य सरकार संबधित मत्स्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे.
- किरण वाघमारे, सहायक मत्स्यविकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

Shahuwadi crime : कोल्हापुरातील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना; सख्या भावानेच केला भावाचा खून, भाऊ फरार

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT