पुणे

भीमाशंकरमध्ये भाविकांना वाहतूक कोंडीचा फटका

CD

मंचर, ता. १ : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नववर्षानिमित्त दर्शनासाठी व अभिषेकासाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. पण, रस्त्यावर पुरेशा प्रमाणात वाहतूक पोलिस नसल्याने व रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा फटका भाविकांना बसला.
तब्बल दोन वर्षानंतर प्रथमच नववर्षानिमित्त ज्योतिर्लिंगाचे दर्शन व अभिषेक करण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, नगर या भागातून तसेच परराज्यातूनही चारचाकी वाहनातून भाविक आले होते. भीमाशंकर बसस्थानकाच्या पूर्वेला तीन किलोमीटर अंतरामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती. अनेक दुचाकीस्वार नियमबाह्य पद्धतीने वाहन चालून वाहतूक कोंडीमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत होते.
कोरेगाव भीमा परिसरात या भागातील पोलिस बंदोबस्त गेला आहे. त्यामुळे दोन ते तीन होमगार्डचा अपवाद वगळता बंदोबस्त तोकडा होता. वाहनांची संख्या मोठी असल्याने होमगार्ड हतबल झाले होते. बसस्थानक परिसरातही सतत वाहतूक कोंडीला भाविकांना सामोरे जावे लागले. सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT