पुणे

लोणी धामणी येथील विवाहितेला मारहाण

CD

लोणी धामणी येथील विवाहितेला मारहाण

मंचर २ : दोन नंबरचा व्यवसाय करू नये असे सांगितल्याच्या कारणावरून पतीनेच पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत बेल्टने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संजय रामनाथ राक्षे (वय ४०, रा. संगमनेर खुर्द खांडगाव रोड, राक्षेवस्ती ता.संगमनेर) याच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत स्नेहा संजय राक्षे (वय ३०, सध्या रा. लोणी धामणी, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संगमनेर खुर्द (ता. संगमनेर) येथे स्नेहा राक्षे यांचा पती संजय राक्षे याने मानसिक व शारीरीक छळ केला. ‘दोन नंबरचा व्यवसाय करू नको’ असे स्नेहा यांनी म्हटल्या नंतर दारू पिऊन संजयने स्नेहा यांना मारहाण केली. स्नेहा यांनी माहेरहून वडिलांकडून ५० हजार रुपये रुग्णवाहिका घेण्यासाठी आणावेत, म्हणूनही छळ केला. छळाला कंटाळून स्नेहा यांनी वडिलांकडून ५० हजार रुपये आणले. त्या रक्कमेतून रुग्णवाहिका घेतली. रुग्णवाहिकेतून दोन नंबरचा व्यवसाय संजय करत होता. या व्यवसायाला स्नेहा यांनी विरोध केला. त्याचा राग आल्याने एवढ्या दिवस माहेरी का राहिलीस’ या कारणावरूनही त्याने हाताने, कुकरच्या दांडयाने व बेल्टने स्नेहाला मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

SCROLL FOR NEXT