पुणे

‘शिवनेरी जंबो’साठी निधी द्या : वळसे पाटील

CD

मंचर, ता. ३ : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात व ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शिवनेरी जंबो व पाबळ (ता. शिरूर) येथे उपजिल्हा रुग्णालयात तातडीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यासाठी मनुष्यबळ व आवश्यक त्या निधीची तरतूद करावी, अशी सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
पुणे येथे सर्किट हाऊस सभागृहात सोमवारी (ता. ३) संध्याकाळी आयोजित केलेल्या बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, सुभाष मोरमारे, विश्वास कोहकडे, आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांताधिकारी सारंग कोडलकर, शिरूर-हवेलीचे प्रांत अधिकारी संजय देशमुख, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ, अंबादास देवमाने, डॉ. सुरेश ढेकळे यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, ‘‘प्रतिबंधात्मक औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मनुष्यबळ व अन्य सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही सुरू आहे.’’ ‘‘पाबळ उपजिल्हा रुग्णालयासाठी पद मंजूर आहेत, ती ताबडतोब भरावीत. लसीकरणाचा डोस पूर्ण झाल्याशिवाय घर मालकांनी भाडेकरूंना खोल्या देऊ नयेत असा नियम प्रशासनाने करावा,’’ अशी मागणी पाचुंदकरकर यांनी केली.

अवसरी खुर्द ता आंबेगाव येथील शिवनेरी जम्बो सेंटरसाठी पाच कोटी ९७ लाख रुपये खर्च झाला आहे. ३ कोटी ८२ लाख रुपये येणे बाकी आहे. प्रलंबित देयके देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक तरतुदी कराव्यात. तसेच, भविष्यकालीन तरतूदही करावी.
- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT