पुणे

वाळुंजवाडीत पर्यावरण संवर्धनाची शपथ

CD

मंचर, ता. ५ : ग्रामपंचायत वाळुंजवाडी (ता.आंबेगाव) येथे ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात आले. प्लास्टिक मुक्त कचरा विभाजन, जलसंवर्धन स्वच्छता आदींबाबत फलकाद्वारे प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन सामूहिक शपथ घेतली. वसुंधरा स्वच्छ निर्मल व प्रदूषणमुक्त करण्याचा निर्णय घेतला.

“प्लास्टिक पिशवी वापरू नका, त्याऐवजी कापडी पिशवीचा वापर करा ही काळाची गरज असून, झाडे लावा, झाडे जगवा, ओला व सुका कचरा वेगळा करा, आपला परिसर स्वच्छ ठेवा” असे आवाहन पठारे यांनी केले.
कोल्हे म्हणाल्या, वाळूंजवाडी परिसरात डोंगर व टेकड्या आहेत. येथे जलसंवर्धन, पाणी आडवा, पाणी जिरवा, हा उपक्रम राबवावा, त्यामुळे परिसरातील विहिराच्या पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होईल.”
अग्रभागी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्‍हे, माजी सरपंच मनोहर लाड, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी व बालचमू होते.
प्रभातफेरीमध्ये ग्रामविकास अधिकारी सचिन नवले, पोलिस पाटील, सागर वाळुंज, नवनाथ वाळुंज, मनोहर लोंढे, सतीश शिंदे , विष्णू वाळूंज आदींनी सहभाग घेतला.

ग्रामस्थांकडून स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम
प्लास्टिक मुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे गावकऱ्यांनी जाहीर केले. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गावठाणात स्वच्छता मोहीम राबवली. दहा किलो कचरा गोळा केला. ओला व सुका कचरा विलगीकरण करणे, याबाबत प्रात्यक्षिकासह सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. लागवडीसाठी वृक्ष देणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फलक वृक्षाला लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
......................................................
04657

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT