पुणे

निघोटवाडी अपघातातील जखमी महिलेचे निधन

CD

मंचर, ता. १३ : मंचर ते घोडेगाव रस्त्यावर निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने मंगळवारी (ता. ११) झालेल्या मोटारसायकल अपघातात शुभांगी गणेश शेवाळे (वय ३६) या गंभीर जखमी झाल्या होत्या. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे गुरुवारी (ता. १३) निधन झाले. आंबेगाव तालुका शिवसेना सोशल मीडियात त्या काम करत होत्या. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्या घोडेगाववरून मोटरसायकलवर पती गणेश शेवाळे यांच्यासमवेत मंचरकडे येत होत्या. चौपदरीकरण रस्ता बाह्यवळणावर असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. त्यांच्यावर मंचर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे लांडेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
04720

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT