पुणे

जुन्नर बाबा रामदेव पोलीस चौकशीचा आदेश

CD

बाबा रामदेव यांची चौकशी करा
जुन्नर न्यायालयाचे पोलिसांना आदेश; कोरोनील औषधासंदर्भातील प्रकरण

जुन्नर, ता. ७ : ‘पतंजली’च्या कोरोनील या औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या योगगुरु बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांची पोलिस चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश जुन्नर न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सपकाळ यांनी दिला आहे.

कायदा अभ्यासक मदन कऱ्‍हे यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत बाबा रामदेव यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. कोरोना बरा करणारे औषध ‘कोरोनिल’ शोधून काढल्याचा दावा बाबा रामदेव यांनी २४ जून २०२० रोजी दिल्लीत केला होता. यामुळे नागरिकांची दिशाभूल झाली, असा आरोप करीत कुऱ्हे यांनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात खासगी फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल केली. या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली आहे. गेल्या ४ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश सपकाळ यांनी जुन्नर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अन्वये ७ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
 
६ जुलै २०२० रोजी दाखल झालेल्या खासगी तक्रार प्रकरणावर येथील न्यायालयात युक्तिवाद झाले. तक्रारदाराच्यावतीने युक्तिवादाची लेखी नोंदही सादर करण्यात आली. कोरोना संकटाच्या काळात असे खोटे दावे करण्यामागे भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांकडून केवळ पैसा कमविण्याचा उद्देश असल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
 
अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, ‘‘कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तसेच कायदेशीर व्यवसाय करण्याच्या हक्कांचा प्रत्येकाने जबाबदाऱ्यांसह व वाजवी बंधनांची जाणीव ठेऊन वापर केला पाहिजे. याची मांडणी करणारा हा खालच्या स्तरावरील न्यायालयात चालणारा हा नवीन पायंडा निर्माण करणारा महत्त्वाचा खटला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT