पुणे

घोषवाक्ये, चित्रांमुळे भिंती लागल्या बोलू

CD

जुन्नर, ता. ८ : : जुन्नर तालुका पंचायत समिती कार्यालय व परिसरातील भिंती विविध आकर्षक चित्रे व घोषवाक्यांनी बोलू लागल्या आहेत. यामुळे माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी मदत होत आहे.
अभियानासाठी तालुक्यातील वीसहून अधिक कला शिक्षकांनी पुढाकार घेतल्याने ही किमया साकार झाली आहे. यात संजय वाडकर, संतोष सगर, महिंद्र तोडकर, राजीव जाधव, संतोष सोनवणे, सुनील रोकडे, विकास कोतवाल, प्रदीप सूर्यवंशी, महेश थोरात, सुनील गटकळ, रमेश केदार, वृषाली दांगट, सुजाता आहेर, बाळासाहेब साबळे, प्रदीप मिरगे आदी कलाशिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यामुळे हा अभिनव उपक्रम साकारला असल्याचे गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी सांगितले.
दरम्यान, भिंती रंगविण्याच्या उपक्रमाला सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी किसन खोडदे, समन्वयक शयश मस्करे यांनी विशेष सहकार्य केले.

वसुंधरा अभियानाच्या वातावरण निर्मितीस मदत
माझी वसुंधरा अभियानात नुकताच ग्रामीण भागाचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यालयास भेट देणारे नागरिक, पदाधिकारी यांनी आपल्याही गावात अशाच प्रकारे चित्र माध्यमातून जागृती करण्याचे नियोजन करण्याचे ठरविले आहे. स्थानिक नागरिक कुतूहलाने पाहण्यासाठी थांबत आहेत. या माध्यमातून तालुक्यातील गावातून असे काम झाल्यास वसुंधरा अभियानाची वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे.


03308

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT