पुणे

वाहतूक शाखेसाठी निधी वर्ग

CD

मंचर, ता. २० : येथील क्रीडा संकुल परिसरात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून मंचर पोलिस ठाण्याच्या नियोजित इमारती शेजारी आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलिस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखा उपकेंद्र इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी आठ कोटी ९६ लाख ६७ हजार ४९५ रुपये निधी खर्चाच्या अंदाज पत्रकास डिसेंबर २०२१ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी वित्तीय पूरक अनुदान म्हणून ८९ लाख ६७ हजार रुपये निधी राज्य शासनाच्या वित्त विभागाने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे शुक्रवारी (ता. १८) वर्ग केला आहे, अशी माहिती भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी दिली.
‘‘याबाबतचे निधी वितरण आदेश गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांनी पारित केले आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्थिक गुन्हे, सायबर व वाहतूक शाखा इमारतींचे बांधकाम सुरु होईल.”असे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Akola News: दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; रिधोरा शिवारातील खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Maharashtra Weather : पुढील ५ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा

Adani Defence News: लष्कराच्या भात्यात अदानी डिफेन्सची ‘प्रहार’; ‘मशिनगन’ची पहिली खेप सुपूर्त, ‘मेक इन इंडिया’ची कमाल

Latest Marathi News Live Update : जगावर खतटंचाईचे सावट

SCROLL FOR NEXT