आंदोलन
आंदोलन Sakal
पुणे

मीना खोरे कृती समितीचे गुरुवारचे आंदोलन स्थगित

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - मीना खोऱ्याच्या पाणी प्रश्नासाठी मीना खोरे संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आमदार अतुल बेनके यांचे आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित केल्याचे कृती समितीचे अध्यक्ष सुरेश शेणकर यांनी सांगितले.
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शनिवारी (ता. ९) सावरगाव (ता. जुन्नर) येथे परिसरातील एकनाथवाडी, काचळवाडी, पाबळवाडी, गाढवेवाडी, खिलारवाडी, बस्ती व वडगाव सहानी येथील उपस्थित शेतकऱ्यांनी गुरुवारपासून (ता. १४) साखळी उपोषणाचा निर्णय जाहीर केला होता.

वडज धरणातून उजव्या कालव्याद्वारे सावरगाव परिसरातील वाड्या-वस्त्यांसाठी उपसा सिंचन योजना राबवावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मीना खोरे संघर्ष कृती समितीची मागणी असून, यासाठी पत्रव्यवहार, आंदोलने, बैठका झाल्या. मात्र, हा प्रश्न सुटला नाही. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जुन्नरच्या दौऱ्‍यात कृती समितीच्या सदस्यांना लवकरच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेण्याचे जाहीर आश्वासन दिले. मात्र, कार्यवाही काहीच झाली नाही. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आमदार बेनके हे रविवारी (ता. १०) सावरगाव येथे श्रीराम जन्मोत्सवासाठी आले असता त्यांनी, आपला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल; उपोषण करू नये, असे सांगितले. त्यास कृती समितीचे अध्यक्ष शेणकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत काही काळ उपोषण स्थगित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT