पुणे

मंचरला बुधवारपासून व्याख्यानमाला

CD

मंचर, ता. २५ :“येथे शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव समिती यांच्यावतीने बुधवार (ता. २७) ते सोमवार (ता. २ मे) या कालावधीत लोकनेते माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन नगरपंचायतीच्या प्रांगणात दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे प्रमुख कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले यांनी दिली.
व्याख्यानमालेचे हे ३६ वे वर्ष आहे. व्याख्यानमालेचे उद्‍घाटन बुधवारी (ता. २७) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजीव सदस्या पूर्वा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते व विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. यानिमित्ताने पोवाड्याचा कार्यक्रम होईल, अशी माहिती लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले आणि यात्रा समितीचे अध्यक्ष दत्ता थोरात यांनी दिली.
व्याख्यानमालेत बुधवारी (ता. २७) खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे- छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना, गुरुवारी (ता. २८) माजी आमदार पाशा पटेल- पर्यावरण व शेती, शुक्रवारी (ता. २९) अशोकराव देशमुख-ताणतणाव विरहित आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, शनिवार (ता. ३०) अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी- भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची दिशा, रविवारी (ता. १ मे)- माजी आमदार उल्हास पवार- भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावर व्‍याख्यान देणार आहेत. सोमवारी (ता. २) शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, डॉ. ताराचंद कराळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
“जेष्ठ साहित्यिका शांता शेळके यांच्या जन्म शताब्दीनिमित्त राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या'' मी डोलकर '' या गीतांचा कार्यक्रम होणार आहे.”असे यात्रा समितीचे कार्याध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT