मधुकरराव पिचड sakal
पुणे

आदिवासी संस्थेला डॉ.गोविंद गारे यांचे नाव देण्यात यावे ; मधुकर पिचड

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच आदिवासी समाज समन्वय समिती व आदिवासी समाज प्रबोधिनी यांचे नामकरण व्हावे

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला डॉ. गोविंद गारे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी लढा उभारणार असल्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी तळेरान (ता. जुन्नर) येथे बोलताना सांगितले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच आदिवासी समाज समन्वय समिती व आदिवासी समाज प्रबोधिनी (जुन्नर) यांनी डॉ. गोविंद गारे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था असे नामकरण व्हावे, अशी मागणी केली असल्याचे पिचड यांनी सांगितले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोविंद साबळे यांच्या मातोश्रींच्या निधनानिमित्त तळेरान येथे आयोजित शोकसभेत समाजाला मार्गदर्शन करताना पिचड बोलत होते. पिचड म्हणाले,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था स्वायत्त आहे परंतु बार्टीप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देत नाही किंवा त्यांच्यासाठी योजना आखत नाही.

आदिवासी समाजासाठी ९ टक्के बजेट असताना मागील पाच वर्षात ११ हजार कोटी रुपये खर्चाविना पडून राहिले, ही आदिवासी समाजाची शोकांतिका आहे. संविधानात आदिवासी समाजासाठी अनुसूचित जाती प्रमाणे आरक्षण असावे, यासाठी संविधान समिती सदस्य डॉ. जयपाल मुंडा यांनी आग्रह धरला होता. त्यांनी तशी तरतूद केली असल्याने आदिवासी समाजाने डॉ. मुंडा यांना विसरता कामा नये.यावेळी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ बगाड, माजी आमदार शरद सोनवणे, तुळशीराम भोईर, काळू शेळकंदे, काळू गागरे, मारुती वायाळ, भास्कर रेंगडे,रवींद्र तळपे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT