rabi crop sakal
पुणे

वाल्हेत रब्बी पिकांसाठी थंडीची वाढ फायदेशीर

रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, पावटा आदी पिकांना या पोषक वातावरणाचा फायदा होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

वाल्हे : अवकाळी पावसानंतर सध्या वातावरणात बदल झाला असून, गेल्या आठवडे भरापासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाल्हेसह आडाचीवाडी, वागदरवाडी, सुकलवाडी, पिंगोरी, दौंडज परिसरातील रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, पावटा आदी पिकांना या पोषक वातावरणाचा फायदा होणार आहे.रब्बी पिकांची पेरणी झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पाऊस नव्हता. मात्र, पिकांची उगवण चांगली झाल्यानंतर तीन-चार दिवस जोराचा पाऊस झाल्याने पिकांची वाढीस पोषक वातावरण झाले.(Cold is beneficial for rabi crops)

दरम्यान, मागील आठवड्यापूर्वी लागोपाठ चार ते पाच दिवस ढगाळ हवामान तयार झाल्याने रब्बीतील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, दोन-तीन दिवसांनंतर वातावरण स्वच्छ झाल्याने पिकांवरील रोगराईचे थोडेफार संकट टळले आहे. जोमात आलेल्या रब्बी पिकांमुळे परिसरातील शिवारे हिरवाईने नटली आहेत. सध्या थंडी वाढल्यामुळे रब्बीतील सर्वच पिकांना पोषक वातावरण असल्याने पिके तरारली आहेत. काही दिवस असेच वातावरण राहिले तर रब्बी पिकांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होणार असल्याचे प्रगतशील युवा शेतकरी संभाजी पवार, प्रशांत पवार, सुशांत भुजबळ, सतीश भुजबळ, सागर भुजबळ, धनंजय पवार आदींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT