पुणे

एेतिहासिक बुद्धविहार वर्धापन दिन उत्साहात-PNE21R0453

CD

देहू, ता. २५ ः येथील एेतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा ६७ वा वर्धापन दिन विविध संघटनांनी मोठ्या उत्साहात, विविध कार्यक्रमांनी शनिवारी (ता.२५) साजरा केला. देशातील विविध भागातून आलेल्या हजारो बौद्ध बांधवांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीचे आणि भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपाचे दर्शन घेण्यासाठी रांग लावली होती. भीम गीतांनी परिसर दुमदुमुन गेला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत, येथील एेतिहासिक बुद्धविहाराच्या शेजारी असलेल्या, रेल्वे पटांगणावर हजारो बौद्ध बांधवांनी सकाळी सामुदायिक महाबुद्धवंदना घेतली. शहरातील विविध संस्था, संघटनांनी आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी कमानी, मंडप उभारले होते. तसेच पाणी वाटप आणि अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी एेतिहासिक धम्मभूमी, बुद्धविहारात गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करून धम्मक्रांती केली. यानिमित्त देशातील हजारो बौद्ध बांधव दरवर्षी मोठ्या संख्येने येथे येतात आणि दर्शन घेतात. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देहूरोड शहरात उत्साहाचे वातावरण होते.
समस्त बौद्ध अनुयायांच्या वतीने सामुदायिक बौद्ध अनुयायांची महाबुद्धवंदना घेण्यात आली. यात मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, मावळ, ठाणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील उपासक सहभागी झाले होते. महाथेरो भदन्त ज्ञानज्योती यांच्याहस्ते महाबुद्धवंदना झाली. त्याचप्रमाणे बुद्धविहार कृती समिती, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी आणि धम्मभूमी सुरक्षा समितीच्या वतीने बुद्ध वंदना आणि धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्धविहार कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, बुद्धविहार ट्रस्ट, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय आठवले गट, युवा गट देहूरोड, मावळ प्रबोधिनी, भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन समाज पक्ष यांनी विविध कार्यक्रमांचे आणि अन्नदानाचे आयोजन केले होते.

फोटो - PNE21S30614

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT