पुणे

काझड येथे मुलानेच केला आईचा खून

CD

वालचंदनगर, ता. २ ः जमीन वाटून देत नाही, मागेल तेवढे पैसे देत नाही आदी कारणावरून आईवर मुलाने लोखंडी कोयत्याने वार करून खून केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये घडली. तसेच वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये वडिलांच्या दोन्ही हाताची दोन बोटे तुटली आहेत. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमध्ये अलका पांडुरंग नरुटे (वय ५५, रा. काझड) या महिलेच्या डोक्यात तसेच अंगावर लोखंडी कोयत्याने सपासपा वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अमित पांडुरंग नरुटे (वय ३१, वर्षे रा. सिधोबाची वस्ती, काझड ) याच्यावर गुन्हा दाखल केला असून पांडुरंग बाबूराव नरुटे (वय ६०) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग नरुटे यांची काझड परिसरामध्ये शेती व घर आहे. रविवारी (ता. २) पहाटे एकच्या सुमारास अमित याने आईला शेतामध्ये पंप सुरु करण्यासाठी जायचे असल्याचे सांगून शेतामध्ये घेऊन गेला व उसाच्या शेतामध्ये वार करून निघृण खून केला. आईला जीव मारल्यानंतर वडील पांडुरंग यांना जीव मारण्यासाठी घरी आला होता. वडिलांनाही शेतातील पाइप फुटला असून पाइप जोडण्यासाठी आपण दोघे जाऊ असे म्हणत होता. मात्र वडिलांना संशय आल्याने त्यांनी घराच्या बाहेर जाण्यास नकार दिला. यावेळी अमितने वडिलांच्या डाव्या हाताच्या दंडावर व हातावरती वार केला. यामध्ये त्यांची दोन्ही हाताची बोटे तुटली. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT