पुणे

आईचा खून करणारा आरोपी जेरबंद

CD

वालचंदनगर, ता. ५ : काझड (ता. इंदापूर) येथे आईचा खून करून वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित पांडुरंग नरुटे (वय ३१) या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी सापळा रचून पुण्याजवळील खडकी रेल्वे स्टेशनवर अटक केली.
अमित याने रविवारी (ता. २) पहाटे १ च्या सुमारास आई अलका पांडुरंग नरुटे (वय ५५) यांचा डोक्यात व अंगावर लोखंडी कोयत्याने सपासप वार करून खून केला होता. तसेच, वडील पांडुरंग बाबूराव नरुटे (वय ६०) यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर तो पसार झाला. तो मुंबई व ठाण्यामध्ये गेला होता. तो चेन्नई एक्स्प्रेसने गुलबर्ग्याकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिस व वालचंदनगर पोलिस अमित याच्यावर पाळत ठेवून होते. पोलिसांनी चेन्नई एक्स्प्रेस थांबणाऱ्या सर्व रेल्वे स्टेशनवर सापळे रचले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुण्याजवळील खडकी रेल्वे स्टेशन येताच पोलिसांनी त्याला अटक केली.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, नितीन लकडे, सहायक फौजदार शिवाजी निकम, रवींद्र पाटमास, मोहन ठोंबरे, उत्तम खाडे, अमोल चितकोटे, शैलेश स्वामी, किसन बेलदार यांनी या कारवाईसाठी परिश्रम केले.

३ वर्षांची मुलगी सुखरूप
अमित नरुटे हा आईचा खून केल्यानंतर स्वतःची तीन वर्षाची मुलगी अदिरा हिला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील बालसंगोपन केंद्रामध्ये ठेवून ठाण्याला गेला होता. बुधवारी तो पुन्हा मुलीकडे गुलबर्ग्याला निघाला होता. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांना अदिरा हिची माहिती मिळाली. त्यानंतर वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे तातडीने गुलबर्ग्याकडे रवाना झाले असून, मुलगी सुखरूप असल्याची माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT