वालचंदनगर, ता. १० : निमसाखर (ता. इंदापूर) येथील पाणी पुरवठा योजनेसाठी राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत १९ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये नीरा नदीच्या तीरावर निमसाखर गाव वसलेले आहे. गावची लोकसंख्या वाढत असून, सुमारे १० हजाराच्या जवळपास गेली आहे. नीरा नदी शेजारी असल्यामुळे गावाजवळ क्षारयुक्त पाणी आहे. तसेच, अनेक वर्षांपासून या गावातील नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावातील अनेक नागरिक उन्हाळ्यामध्ये २ ते ५ किलोमीटर अंतरावरून पाणी आणत असतात. गावातील नागरिकांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची वेळोवेळी मागणी केली होती. त्यांनी पाठपुरावा करून १९ कोटी ४४ लाख रुपयांची योजना मंजूर केली. ४ जानेवारी रोजी या योजनेला शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता दिली.
या योजनेतून गावातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. ५४ फाटा येथून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणले जाणार आहे. ते पाणी तलावात सोडून तेथून पंपाद्वारे पाणी टाक्यांमध्ये जाणार आहे. विद्युत पंपाकरीता सौर ऊर्जा संच बसविण्यात येणार असल्याने वीज बिलाचा कायमचा प्रश्न सुटणार असून, वीज नसताही योजना सुरु राहणार आहे. या योजनेसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने शुद्ध पाणी मिळणार आहे.
दरम्यान, पाणी योजना मंजूर केल्याबद्दल निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने भरणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, सरपंच धैर्यशील रणवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस वीरसिंह रणसिंग, रामभाऊ रणसिंग, दीपक लवटे, धोंडिराम कारंडे, गोरख शेळके, शेखर पानसरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.