पुणे

छत्रपती कारखान्याला प्रदूषणामुळे होणार दंड राष्ट्रीय हरित लवाद्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश

CD

वालचंदनगर ता. २४ : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना प्रदूषण करीत असल्याचा ठपका राष्ट्रीय हरित लवाद्याने ठेवला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंडाची रक्कम निश्चित करून ती कारखान्याकडून वसूल करावी, असा आदेश लवाद्याने दिला आहे. या दंडाच्या रक्कमेचा वापर परिसरातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

लवाद्याचे प्रमुख आदर्श कुमार, न्यायाधीश कायदेशीर सदस्य सुधीर अग्रवाल, तज्ज्ञ सदस्य नागिन नंदा, विजय कुलकर्णी, अफ्रोज अहमद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गेल्या महिन्यामध्ये हा निर्णय दिला. छत्रपती कारखान्याच्या प्रदूषणाविरोधात अॅड. विक्रमसिंह पाटील यांनी लवाद्याकडे तक्रार दाखल केली होती.
याबाबत पाटील म्हणाले की, कारखान्यातून निघणारा हानिकारक वायू व दूषित पाण्यामुळे परिसराचे नुकसान होत असून नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झालाआहे. तसेच पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. याबाबत दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीला पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हा अहवाल २८ जुलै २०२१ रोजी लवाद्याकडे अहवाल सादर केला होता. यानंतर कारखान्याने अहवालातील त्रुटी सुधारणार असल्याचे सांगितले होते. मात्र, कारखान्याने त्रुटीची पूर्तता न केली नाही. त्यानंतर यासंदर्भात गेल्या २५ जानेवारीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल दाखल करून अद्याप ही त्रुटी पूर्ण केल्या नसल्याचे सांगितले. त्यानुसार लवादाने कारखान्याकडून दंड वसूल करण्याचे आदेश प्रदूषण मंडळाला दिले.

प्रदूषण मंडळाने या दंडाची रक्कम निश्‍चित करून ती वसूल करावी. दंडाच्या रक्कमेचा विनियोग परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आदेशात नमूद केले असल्याचे पाटील त्यांनी सांगितले. यासंदर्भात कारखानाना प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार कामकाज सुरु असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT