पुणे

लाच मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षक झेंडेवर गुन्हा

CD

चाकण, ता. ३०ः येथील पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे व एका खासगी एजंटावर लाच मागून ती घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एजंट अख्तर शेखावत अली शेख (वय ३५) याला अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिली.
चाकण (ता. खेड) पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याने सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आरोपी झेंडे याच्यासाठी सत्तर हजार रुपये व खासगी एजंटसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी उपनिरीक्षक झेंडे याने साहाय्य केले व आरोपी शेख याने लाचेची रक्कम स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून शेख याला लाच घेताना पकडले. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक क्रांती पवार करत आहेत. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक झेंडे याच्याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी होत्या. त्याने खासगी एजंट नेमले होते. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

बापरे! राणादाने घटवलं तब्बल २५ किलो वजन, व्यायामाबद्दल बोलताना हार्दिक जोशी म्हणाला...

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

SCROLL FOR NEXT