पुणे

शेती मातीची वेदना हीच काव्याची प्रेरणा ः चांदगुडे

CD

भिगवण, ता. २ : एका बाजूला शेतकऱ्याला आपण अन्नदाता असा सन्मान देतो, तर दुसऱ्या बाजूला युद्धामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले ही वस्तुस्थिती आहे. कष्टकऱ्यांची ही वेदना समाजापर्यंत पोहोचली पाहिजे या भावनेतून एका हातात कुदळ व दुसऱ्या हातात लेखणी घेतली आणि शेती व मातीची वेदना कवितांमधून मांडू लागलो व त्यातून मी कवी हनुमंत चांदगुडे झालो अशी भावना सुपे (ता. बारामती) येथील कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केली.
येथील कला महाविद्यालयामध्ये नूतन वर्षाच्या निमित्ताने लेखक आपल्या भेटीला उपक्रमाअंतर्गत "अशी स्फुरते कविता" या विषयावर ते बोलत होते.
चांदगुडे पुढे म्हणाले, माझी ‘आळाशी’ ही कविता बालभारतीने इयत्ता आठवीच्या पुस्तकांमध्ये निवडली व त्यानंतर कवी म्हणून राज्यभर ओळख मिळाली. कवितांच्या माध्यमातून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या वेदनांना शब्दरूप देऊन त्या समाजापर्यंत पोहोचविल्या.’’
यावेळी प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, डॉ. काशिनाथ सोलनकर, संपत बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रणजित भोंगळे, संपत बंडगर, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, डॉ. काशिनाथ सोलनकर, हेमंत रेडे उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी केले. तर आभार डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
32170

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT