पुणे

भोरच्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थी झाले डिजिटल

CD

भोर, ता. ३ ः केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने ग्रामपंचायती आणि शासकीय संस्थांना दिलेल्या मोफत इंटरनेटच्या सुविधेमुळे अतिदुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर सुरु केला आहे. बीएसएनएल सीसीए ऑडिटर प्रीती रत्नपारखी यांनी भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ग्रामपंचायतीमधील इंटरनेट कनेक्शनची नुकतीच पाहणी केली.
तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील शिरवली हिमा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. याबद्दल केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), भारत ब्रॉडबँड निगम लिमिटेड (बीबीएनएल) आणि सीएससी वायफाय चौपाल या कंपन्यांचे अभिनंदन केले. टेलिफोन एक्सेंजपासून सुमारे ४८ किलोमीटर अंतरावरील शाळांमधील इंटरनेट कनेक्शनचा स्पीड योग्य प्रमाणात आणि कनेक्शन बंद न पडता सलग सुरू आहे. यामुळे रत्नपारखी यांनी तालुक्यात या कामाचे नियंत्रण करणारे सीएससी वायफाय चौपालचे तालुका प्रतिनिधी (चॅंप व्हिएलई) विजय जाधव, बीबीएनएलचे नेटवर्क इंजिनिअर योगेश भास्कर आणि तालुका पातळीवरील फिल्ड इंजिनिअर प्रतीक नाळे यांचेही कौतुक केले. यावेळी सीएससी वायफाय चौपालचे पुणे विभागाचे समन्वयक अंकुश अंबोरे, मुळशी तालुक्याचे प्रतिनिधी मिलिंद चुटके, शैलेश शितोळे, संदीप जगताप, अजय ढवळे, कार्तिक गोरे, योगेश धामुनसे व राहुल धामुनसे आदी उपस्थित होते.
शिरवली हिमा शाळेचे मुख्याध्यापक धनराज उगले व सहशिक्षक हरिदास मुंडे यांनी शाळेत सुरु असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी इंटरनेटव्दारे शाळेतील स्मार्ट टीव्हीवर विद्यार्थी अभ्यास करीत असल्याचे सांगितले.
भोरच्या अतिदुर्गम भागात इंटरनेटची सेवा उत्तमरीतीने सुरु ठेवल्याबद्दल बीबीएनएलचे विभागीय प्रबंधक एन. के. लोढा, सल्लागार पी. व्ही. देशमुख आणि सीएसी वायफाय चौपालचे राज्याचे समन्वयक नीलेश कुंभारे यांनी भोरमधील टीमचे अभिनंदन केले.

ग्रामपंचायतींनी केबलची काळजी घ्यावी
ग्रामपंचायतींमधील रस्ते, पाइपलाइन व इतर शासकीय कामांमुळे बीएसएनएलची केबल अनेक वेळा तुटते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमधील आणि शासकीय संस्थांमधील इंटरनेट सुविधा बंद पडते. यासाठी ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी केबल न तुटण्याची काळजी घ्यावी. बीएसएनएलच्या साहित्यास नियमित वीजपुरवठा सुरु ठेवावा, असे आवाहन सीएससीचे विभागीय समन्वयक अंकुश अंबोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT