पुणे

भोर एसटी आगारातून दररोज ३८० फेऱ्या रद्द

CD

भोर, ता. १ : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातून एसटीच्या दररोज ४४० फेऱ्या होत असत. परंतु, संपामुळे फक्त ४५ कर्मचारी कामावर असल्यामुळे केवळ ६० फेऱ्या पूर्ण होतात. त्यामुळे एसटीची अवस्था बंद असल्यासारखीच आहे.
भोर आगारातील कार्यरत असलेल्या १०७ चालकांपैकी ९६ चालक, ७४ वाहकांपैकी ५८ वाहक, ३३ यांत्रिकी कर्मचाऱ्यांपैकी ३० आणि १६ प्रशासकीय कर्मचाऱ्यांपैकी १, असे एकूण १८५ कर्मचारी संपावर आहेत. त्यामधील ३३ चालक, २४ वाहक, १० यांत्रिकी कर्मचारी आणि १ प्रशासकीय कर्मचारी, यांचे निलंबन केले आहे. निलंबनाची सुनावणी सुरू असूनही संबंधित कर्मचारी सुनावणीस हजर राहात नाहीत.
भोर आगारातील २३० कर्मचाऱ्यांपैकी १८५ कर्मचारी अद्यापही संपावर आहेत. त्यामुळे एसटीच्या दररोज ३८० फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. संपावर असलेल्या ६८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. अद्यापही कर्मचारी संपावर असल्यामुळे एसटी आगाराचे नुकसान होत आहेच. तसेच, ग्रामीण भागातील प्रवाशांना पुरेशी सेवा मिळत नाही. भोरमधून केवळ पुणे, टिटेघर, शिरवळ, महुडे, चिखलगाव व म्हसर या ठिकाणी एसटीची सेवा सुरु आहे. मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर व पंढरपूर या ठिकाणासाठीच्या एसटी अद्यापही सुरु केलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Weather: 'कालबैसाखी’ने नाइट रायडर्सचे टेंशन वाढवले; कोलकाताहून Live अपडेट्स, कट ऑफ टाईम अन् नियम Explain

'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Mumbai News : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण, सेवा किमान महिनाभर ठप्प

Latest Marathi News Live Update: अजूनही निवडणूक बिनविरोध होऊ शकते- चंद्रकांत पाटील

SCROLL FOR NEXT